अधिक माहितीसाठी पुढील ई - मेल आय डी वर संपर्क करा . kavitalk78@gmail.com
आमच्या ऑन लाईन शिवणकलेच्या ब्लॉगवर सदस्यत्व घेण्यासाठी : -
Contact me यात माहीती भरून पाठवा.
ब्लॉगची फी : -
महीना - १००० रु .; महिन्या संपल्यावर पुढच्या महिन्याची फी येईपर्यंत ब्लॉगवरील सदस्यत्व स्थगित करण्यात येईल .
शिवणकला शिकण्यासाठी आवश्यक असणारी पूर्व तयारी : -
१] शिवणयंत्र असणे आवशयक .
२] शिवणयंत्र व्यवस्थित चालवता येणे आवश्यक ; नीट येत नसल्यास सराव आवश्यक .
शिवणकलेसाठी लागणाऱ्या आवश्यक प्राथमिक गोष्टी : -
१] शिवणयंत्र
२] कात्री
३] कापड
४] मेजर टेप
५] चॉक
६] जुने वर्तमानपत्र - पेपर कटिंग साठी
७] डायग्राम बुक
८] पेन्सिल
९] पेन
१०] धागा
१२] पेपर क्यानव्हास
१३] स्टिच ओपनर
१४] फुटपट्टी
काय काय शिकवले जाईल ?
१] साधी कुर्ती
२] कुर्तीचे १० वेगवेगळे डीझाईन्स
३] साधा सलवार
४] कळीवाला सलवार
५] साधा चुडीदार
६] कळीवाला चुडीदार
७] सेमी पटीयाला
८] फुल पटीयाला
९] साधा अनारकली
११] अनारकलीचे १० वेगवेगळे डीझाईन्स
१२] लटकन बनवणे
१३] साधा ब्लाउज
१४] साधा योक ब्लाउज
१५] कटोरी ब्लाउज
१६] साधा प्रिन्स कट ब्लाउज
१७] प्रिन्सेस कट ब्लाउज विथ योक
१८] ब्लाउजचे १० वेगवेगळे डीझाईन्स
१९] परकर
२०] लेडीज जाकीट
=======================================================================
ऑन लाईन सपोर्ट शिवाय आवश्यकता भासल्यास फोन , whats-app द्वारे मार्गदर्शन केले जाईल .
=======================================================================
=======================================================================
शिवण यंत्र / अथवा शिलाई मशीन
१) हात मशीन : -
मशीन
चालवण्यासाठी हाताचा वापर करावा लागतो. माशिनिचा वेग खूप हळु असतो; दोन्ही
हात व्यस्त राहतात . जुन्या सिनेमामध्ये हिरोची आई जी मशीन वापरत असे तशी
मशीन .
२) पायाची मशीन : -
हि मशीन चालवण्यासठि
पायाचा वापर करावा लागतो . आजकाल सगळीकडे ह्याच मशिनिचा वापर केला जातो.
ह्या माशिनिला पायाच्या भागाजवळ स्टेण्ड असते व पायाने चालविण्यासाठी एक
पायटा असतो . स्टेन्ड ला मोठे चाक बसवलेले असते. वरची मशीन आणि खालचे चाक यांना एका चामडी वादीने जोडलेले असते. खालचे चाक आणी पायटा यांना एका
दांडीने जोडलेले असते. वरच्या मशिनचे छोटे चाक उजव्या हाताने फिरवल्यास
खालचे चाक व पायटा फिरू लागतो व मशीन सुरु होते. यामुळे दोन्ही रिकामे
राहतात व कामही लवकर होते.
३) इलेक्ट्रीक मोटर असलेली मशीन : -
पायाच्या माशिनिला इलेक्ट्रीक
मोटर जोडलेली असते. स्पीड खूप जास्त असतो . नवशिक्यांना आटोक्यात चालवणे
खूप कठीण जाते. नेहमी चालवणाऱ्या साठी उत्तम . काम भराभर होते. वीज पुरवठा
खंडीत झाल्यावर चामड्याची वादी लावून पायाच्या मशिनी प्रमाणे चालवता
येते.
- साध्या शिवणकामाच्या मशिनचे प्रकार
- हाफ शटल : -
मशिनची बॉबीन अर्ध गोलाकार फिरते.
बॉबिन केस निराळी असते. फुल शटलच्या मशिनीत बसत नाही.
मशीनच्या सुईचे भोक समोर असते.
धागा भरण्याची सेटींग बाजूच्या दिशेने असते.
मशिनची सुई निराळी असते. फुल शटलच्या मशिनीत बसत नाही..
- फुल शटल : -
मशिनची बॉबीन पुर्ण फिरते.
बॉबिन केस निराळी असते. हाफ शटलच्या मशिनीत बसत नाही.
मशीनच्या सुईचे भोक बाजूच्या दिशेने असते.धागा भरण्याची सेटींग बाजूच्या दिशेने असते. मशिनची सुई निराळी असते. हाफ शटलच्या मशिनीत बसत नाही..
- शक्यतो फुल शटल ची असावी .
- माझी काही कारागिरी